सजग नागरिक टाइम्स:पुणे शहरातील पोलीस हे नागरिकांना भीती दाखवून व खोट्या पावत्या देऊन व खोटे गुन्हे नोंदवून फसविले असल्याचे अनेक नागरिकाच्या चर्चेचे विषय असत .पण या बहाद्दराने तर पोलिसांनाच फसवून शासनाचे ८१.२१२/४६ रुपयाची फसवणूक केली असल्याचे उघडकीस आले आहे.
८ नोव्हेंबर रोजी सेव्हन लव्हज चौकात वाहतूक विभागातील पोलीस निरीक्षक एस बी पाचोरे कर्मचार्यांसह वाहने तपासणी करत असताना वाहन चालक असिफ आरिफ शेख रा.कोंढवा त्याने त्याज्या मोबाईल मधील मेसेज दाखवून अगोदरच दंड भरल्याचे सांगितले.पोलिसांना मेसेजचा संशय आल्याने त्यांनी ते बारकाईने पहिले असता तो बनावट असल्याचे दिसून आले.ज्याने हे मेसेज पाठवले त्या अजीज मोहम्मद शेख रा.झांबरे प्यालेस महर्षीनगर यास घटनास्थळी बोलावून त्याचा मोबाईल तपासले असता मोबाईल इनबॉक्स मध्ये ३९ जणाना मेसेज पाठवले असल्याचे कळाले.बनावट मेसेजला ते खरे असल्याचे भासवून पोलिसांचे व शासनाचे ८१.२२१२/४६रु फसवणूक केली असल्याचे पोलिसांनी तक्रारीत नमूद केले आहे.सदरील पुढील तपास स्वारगेट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित करत आहे.
बनावट ई-चलन मेसेजद्वारे पोलिसांना फसविणारे पोलिसाच्या जाळ्यात
RELATED ARTICLES