अनधिकृत बांधकामावर चढला बुलडोजर..
सनाटा प्रतिनिधी ” पुणे शहरा मध्ये दिवसेंदिवस अनधिकृत बांधकामाची संख्या वाढतच चाललेली असुन बांधकाम विभाग मात्र झोपी गेलेले दिसत आहे. पुणे शहरातील कोंढवा परिसरातील पारगे नगर सर्वे नंबर 37 मध्ये पारगे बिलडर ने रस्त्यावरच तारेचे व भिंतीचे कंपाउंड बांधुन रस्ताच हजम करण्याचा प्रयत्न केला होता सदरील जागे संदर्भात समाजिक कार्यकर्ते समिर शफी पठाण यांनी सातत्याने पाठपुरावा करून अनधिकृत पणे बांधणयात आलेले भिंतीचे कुंपन पाडण्यास शासनाला भाग पाडले
पुणे शहरातील बांधकाम विभाग कुंभकर्णा सारखे झोपत असल्याचे पुणेकरांना अनुभव येत असुन असे झोपणारयांना उठविणयाचे काम समिर शफी पठाण यांनी केले असल्याचे सनाटा प्रतिनिधीला सांगितले..