Homeताज्या घडामोडीअपघाती निधन झालेल्या पैलवानांना श्रद्धांजली अर्पण

अपघाती निधन झालेल्या पैलवानांना श्रद्धांजली अर्पण

Patanjali Honey, 1kg Price:260.00
Patanjali Rice Bran Oil Can, 5L 525.00 ( 105.00 / liters)

सजग नागरिक टाइम्स:सांगली येथे अपघाती निधन झालेल्या पै. आकाश देसाई , पै. सौरभ माने,पै.विजय पाटील,पै. शुभम घार्गे , पै.अविनाश गायकवाड यांना गोकुळ वस्ताद तालीम व शिवरामदादा तालीम यांच्या संयुक्त विद्यमाने श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती . या श्रद्धांजली सभेचे आयोजन   पै. राजेश बारगुजे व माजी नगरसेवक मनीष साळुंके यांनी केले होते .भवानी पेठमधील गोकुळ वस्ताद तालीमजवळील  रामोशी गेट चौकात झालेल्या या श्रद्धांजली सभेमध्ये शिवसेना पुणे शहर प्रमुख महादेव बाबर , चंद्रकांत मोकाटे ,   माजी  नगरसेवक विरेंद्र किराड , रविंद्र माळवदकर , भाई कात्रे , प्रभाग क्र.१८ शिवसेना विभागप्रमुख रुपेश आप्पा पवार, प्रभाग क्र.१८ चे  नगरसेवक अजय  खेडेकर ,महाराष्ट्र केसरी अभिजित कटकेचे मार्गदर्शक भरत म्हस्के , महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड , राष्ट्रीय विजेता संतोष गरुड , आशियायी सुवर्णपदक विजेता  रविं,द्र पाटील व  विविध  तालीममधील पैलवान उपस्थित होते.यावेळी उपस्थितांनी आपली मनोगते व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली .

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular