ब्रेकिंग न्यूज

अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला 7 जण ठार

Advertisement

10 जुलै : अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला 7 जण ठार

अमरनाथ यात्रेवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 14 जण जखमी तर 7 यात्रेकरूं ठार झाले अनंतनाग जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी हे हल्ले झालेत. त्यातला एक हल्ला हा अमरनाथ यात्रेच्या गुजरात बसवर झाला. त्यात 4 यात्रेकरू जागीच ठार तर 10 यात्रेकरू जखमी झाले. या बसमधून 17 यात्रेकरू प्रवास करत होते. रात्री सव्वा आठच्या सुमाराला दहशतवाद्यांनी पोलीसावर हल्ला केला त्यास पोलीसांनी चोख प्रतिउत्तर दील्याने ते पळून जात असताना दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केले त्याच वेळी अमरनाथचे दरशन घेऊन यात्रेकरू अमरनाथ मंदिराचं दर्शन घेऊन मीर बाजारला जात होते दहशतवाद्यांच्या बेछूट गोळीबारात ती बस ही आली .
अनंतनाग पोलिसांच्या म्हणण्यानुसार या बसच्या ड्रायव्हरने अमरनाथ यात्रेसाठीची अधिकृत नोंदणी कलेेली नव्हती. त्यामुळेच तिला सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आलेली नव्हती तसेच ही बस अमरनाथ यात्रेच्या मुख्य ताफ्यातही सामिल नव्हती कदाचित त्यामुळेच अतिरेकी या बसवर हल्ला करू शकले. असेही पोलिसांनी सांगितलें. जखमी यात्रेकरूंना श्रीनगर आणि अनंतनागमधील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलेले आहे.

Advertisement

 

दरम्यान, दहशतवाद्यांच्या निशाण्यावर यात्रेकरू नव्हे तर पोलीस होते, अशी माहिती काश्मिर पोलीस महासंचालकांकडून दिली जात आहे.

Share Now

Leave a Reply