Homeताज्या घडामोडीएकवीस हजार सामुदायिक सूर्यनमस्कार यशस्वी.

एकवीस हजार सामुदायिक सूर्यनमस्कार यशस्वी.

सजग नागरिक टाइम्स:पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री म्हाळसाकांत विद्यालय आकुर्डी पुणे येथे रथसप्तमी निमित्त एकवीस हजार सामुदायिक सूर्यनमस्कार उद्दिष्ठ पूर्ण करण्यात आले. कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवसाय अभ्यासक्रम व माध्यमिक विभागातील २०९५ विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता.
श्री म्हाळसाकांत विद्यालयाच्या क्रीडा संकुल क्रीडांगणावर सूर्यनमस्कार उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. विद्यालयाचे प्राचार्य अन्सार शेख व आंतरराष्ट्रीय योगा पट्टू व भारतीय योगा संघाचे प्रशिक्षक यांच्या हस्ते ओंकार प्रतिमेचे पूजन करून सदर उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
अमाझोन ऑफरच्या माहितीसाठी लिंकवर क्लिक करा.

आंतरराष्ट्रीय खेळाडू व पंच, महाराष्ट्र योगा असोसिएशनचे महासचिव, भारतीय योगा संघाचे प्रशिक्षक चंद्रकांत पांगरे यांच्या मार्गदर्शना खाली सूर्यनमस्कार घेण्यात आले. पुणे डिस्ट्रिक्ट योगा अँड फिटनेस इन्स्टिट्यूट पदाधिकारी व आंतरराष्ट्रीय पंचाच्या मदतीने सूर्यनमस्कार उपक्रम घेण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. आंतरराष्ट्रीय योगासन खेळाडू श्रेया कंधारे, धनश्री पाटील, दत्तात्रय काळे, शुभम जाधव, यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कारचे डेमो दिले. विद्यार्थ्यांच्या अंगी शाररिक सुदृढता यावी, यिगासनातील विविध आसनांची माहिती व्हावी, विद्यार्थ्यांना नियमित सूर्यनमस्कार करून प्रकृती योग्य राहावी याच दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार अंगीकृत करण्यासाठी आजपासून नियमित सूर्यनमस्कार घालावे. यातून होणार व्यायाम फायदेशीर असतो असे चंद्रकांत पांगरे यांनी सांगितले.

विद्यालयात क्रीडा शिक्षक अनिल दाहोत्रे, शरद सस्ते व सिंधू मोरे यांच्या प्रयत्नातून सूर्यनमस्कार उपक्रमाचे आयोजिन करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी चालणे व सूर्यनमस्कार नियमित केले तर आपण दीर्घायुष्य होऊ, अभ्यासाबरोबर व्यायाम नित्याचा आहे असे प्राचार्य अन्सार शेख यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी मुख्याध्यापिका शैलजा गायकवाड, अंजली फर्नांडिस, उपप्राचार्य बाबासाहेब शितोळे, उपमुख्याध्यापक दीपक साळूखे, पर्यवेक्षक रोहिदास ठाकूर, आंतरराष्ट्रीय खेळाडू सिंधू मोरे, दिनेश कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपसचिव एल एम पवार, पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, निगडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पळसुले यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. पिंपरी चिंचवड मध्ये मोठ्या प्रमाणावर सूर्यनमस्कार उपक्रम राबवल्याबद्दल क्रीडा शिक्षक प्रा अनिल दाहोत्रे व स्टाफचे संस्थेचे मानद सचिव संदीप कदम, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, खजिनदार मोहनराव देशमुख, सहसचिव प्रशासन आत्माराम जाधव, सहाय्यक सहसचिव डॉ महादेव चासकर, क्रीडाप्रमुख शाम भोसले यांनी अभिनंदन केले उपप्राचार्य बाबासाहेब शितोळे यांनी आभार, प्रा शरद सस्ते यांनी सूत्रसंचालन केले. या उपक्रमाचे नियोजनासाठी व यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक प्रा अनिल दाहोत्रे, प्रा शरद सस्ते, प्रा अशोक आवारी, प्रा सिंधू मोरे, प्रा मंदार देसाई व प्रा ज्ञानेश्वर चिमटे, क्रीडा संचालक, बाळासाहेब उदावंत यांनी परिश्रम घेतले

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular