ताज्या घडामोडी

छावा संघटनेने संपावर गेलेल्या तलाठ्यांच्या खुर्चीला वाहिले फुल व हार

Advertisement

सजग नागरिक टाइम्स: पुणे शहरातील तलाठ्यांनी पुकारलेल्या संपाविरोधात छावा संघटनेने आक्रमक होऊन विश्रांतवाडीतील तलाठी कार्यालयातील तलाठीच्या खुर्चीला फुले व हार वाहून आंदोलन केले.  तलाठी महासंघाने सोमवारपर्यंत हे आंदोलन मागे घेतले नाही तर छावा संघटना तलाठी कार्यालयांच्या विरोधात आंदोलनाला सुरूवात करून शहरातील सर्वच तलाठी कार्यालयाला टाळे ठोकणार असा इशारा यावेळी देण्यात आला.

हेपण वाचा :भररस्त्यात दारुड्याने पोलिसाला चावले

Advertisement

पुणे :लाच घेताना महिला पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचारी अॅनटी करप्शनच्या जाळ्यात

शैक्षणिक प्रवेश,  शिष्यवृती फी सवलत,किंवा महानगरपालिकेच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी तहसीलदारांचा उत्पन्न दाखला गरजेचा असतो. परंतु  सध्याच्या तलाठ्यांच्या आंदोलनामुळे नागरिकांना व विद्यार्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे छावा संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.यावेळी संघटनेचे विश्रांतवाडी प्रमुख धनंजय जाधव,अॅड.वाजेद खान बिडकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
 

Share Now

Leave a Reply