सजग नागरिक टाइम्स:पुणे :दौंड तालुक्यात एसआरपीएफच्या जवानाने बेछूट गोळीबार करून तिघांचा खून केला . दौंडमधील बोरावके नगर आणि नगर मोरी चौकमध्ये मंगळवारी दुपारी ही खळबळजनक घटना घडली. यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला आहे.
या माथेफिरूचे नाव संजय शिंदे असे असून त्याने सुरुवातीला नगर मोरी चौकात दोघांवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर तिसऱ्या व्यक्तीच्या घरी जाऊन त्याच्यावर बेछूट गोळीबार करून त्याचा खून करून संजय शिंदे आपल्या घरी लपून बसला. पोलिसांनी त्याचा माग काढत त्याच्या घराला वेढा घातला. बराच वेळ आवाहन केल्यानंतर तो घराबाहेर पडला आणि पोलिसांनी त्याला अटक केली.या हत्यांमागील नेमके कारण अद्याप पोलिसांना कळालेले नाही दौंड पोलीस अधिक तपास करत आहे .