ताज्या घडामोडी

जेष्ठ महिलांना लुटणारे चोर गजा आड.सोन्याचे बिस्किटाचे दिले आमिष .

Advertisement

 पुणे शहरातील गजबजलेले मंडई परिसरात जेष्ठ महिला  नागरिकाला लुटण्याचे प्रकार चालू असताना एका सावध नागरिकाने सदरील बाब खडक पोलीस स्टेशनला कळवून दोन भामटे चोर धरून देण्यास मदत केली . दोन भामटेकडून खडक पोलिसांनी बनावट सोन्याची बिस्किटे व सोन्याची साखळी जप्त केली आहे .श्रीमती .प्रमिला गोवर्धन गिरमे वय ७८ रा .४०४ सदाशिव पेठ पुणे हे गुरुवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास बाजीराव रोडवरून मंडईला पायी  जात असताना त्याचा पाठलाग करत असलेले दोन इसम जाणवले .ते दोघेजण  त्यांच्या जवळ येऊन म्हणाले कि समोरच्या मुलाकडे दोन सोन्याचे बिस्कीट आहे .त्यातील एक बिस्कीट मी घेतो व एक तुम्ही घ्या आपण त्या मुलाला पन्नास हजार रुपये देऊ . प्रमिला गोवर्धन गिरमे यांना संशय आल्याने त्यांनी त्या इसमास म्हणाले कि माज्याकडे फक्त ५०० रुपये आहे .त्या इसमाने बळजबरीने ५०० रुपये घेतले व गळ्यात  असलेले सोन्याची चेन व पाटल्या मागू लागला गिरमे यांनी  नकार देताच .ते ५०० रुपये घेऊन पळून गेले हा प्रकार घडत असताना अमित पवार या नागरिकाने पहिले व खडक पोलिसांना या सगळ्या  प्रकाराबद्द्ल माहिती दिली  .  घटनेचे गांभीर्य पाहून खडक पोलीस स्टेशन चे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी उपनिरीक्षक संजय गायकवाड यांना शोध घेण्याच्या सूचना दिल्या.व त्यांतर पोलीसांन्नी या दोघांना सराफ बाजारात फिरत असताना  सापळा रचून अटक केले .व त्यांचे कडे चौकशी केली असता त्यांनी इतर ठिकाणीही असेच प्रकार केले असल्याचे  कबूल केले . त्यांच्या कडून खडक पोलिसांनी ५०० रुपये ,बनावट सोन्याची बिस्किटे व सोन्याची साखळी जप्त केले  आहे .त्यांना कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना ३१ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली .

Share Now

Leave a Reply