ब्रेकिंग न्यूज

दाऊदच्या साम्राज्याचा वारसदार कोण होणार

Advertisement

दाऊदच्या साम्राज्याचा वारसदार कोण होणार ?

Advertisement

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमची प्रकृती खालवल्याच्या वृत्तानंतर दाऊदच्या काळ्या साम्राज्याचा वारसदार कोण? याबद्दल चर्चा सुरू आहेत. दाऊदचा भाऊ अनिसकडे सर्व सूत्रे येतील असे काहींचे मत आहे तर दाऊदचे निष्टावंत आणि कुटुंबिय यांच्यातत्याच्या साम्राज्याचे वाटप होणार असल्याचे काहींचे मत आहे. मुंबईतील १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा सूत्रधार दाऊद इब्राहीम जगातील दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत अंडरवर्ल्ड डॉन आहे. ‘फोर्बज’ या मासिकाने २०१५मध्ये दाऊदची मालमत्ता ६.७ अब्ज डॉलर इतकी असल्याचे म्हटले होते. यापूर्वी १९८९ मध्ये याच मासिकाने कोलंबियातील डॉन पॅब्लोइस्कोबारची मालमत्ता ९ अब्ज डॉलर असल्याचे म्हटले होते. दाऊदचे साम्राज्य दक्षिण आशिया, अफ्रिका आणि युरोप या ३ खंडात पसरले असून १२ पेक्षा अधिक देशांतत्याचे नेटवर्क आहे. भारत, नेपाळ, दक्षिण अफ्रिका, युएई, ब्रिटन, श्रीलंका, तुर्की, फ्रान्स, स्पेन, मोरोक्को, सायप्रस, थायलंड, मलेशिया, सिंगापूर अशा देशांतून दाऊदला पैशांचा ओघ सुरूच आहे. आजही त्याच्या कमाईतील ४० टक्के इतका हिस्सा भारतातून येत असल्याचे सांगितले जाते. निव्वळ ब्रिटनमध्येच दाऊदची मालमत्ता ही ४५० दशलक्ष डॉलरची आहे. बनावट नोटांचे रॅकेट चालवणे हा दाऊदचा मुख्य भारतातील प्रमुख व्यवसाय असून चलन बंदीच्या निर्णयामुळे दाऊदला जबर दणका बसला आहे. हिऱ्यांची तस्करी हा दाऊदचा प्रमुख व्यवसाय बनला असून छोटा शकील हा व्यवसाय सांभाळतो. आंतरराष्ट्रीय दहशतवादीसंयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेने दाऊदला जागतिक दहशतवादी घोषीत केले आहे. अल कैदाचा मृत म्होरक्या ओसामा बिन लादेनशी दाऊदचे घनिष्ट संबंध होते. आताही अयमन अल जवाहिरीशी त्याचे उत्तम संबंध आहेत. २६/११ च्या हल्ल्यातही दाऊदचा हात होते
☄दाऊद पाकिस्तानतच भारताने संयुक्त राष्ट्रांना दाऊदचे पाकिस्तानातील पत्ते दिलेहोते. भारताने दिलेल्या ९ पैकी ६ पत्त्यांना संयुक्त राष्ट्राने दुजोरा दिला आहे. दाऊदचा सध्याचा पत्ता कराची डी – १३, क्लिफ्टन असा आहे. या परिसर पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत परिसर आहे. ६ हजार चौरस यार्ड इतक्या परिसरात दाऊदचा बंगला आहे. दाऊद राहत असलेल्या परिसरात ‘नो स्ट्रेस पासिंग’झोन असून येथील सुरक्षेची जबाबदारी पाकिस्तान सरकार स्वत: पाहते.
☄दाऊदची १५ नावे संयुक्त राष्ट्रांनी दाऊद इब्राहीमची १५ उर्फ नावे जाहीर केली आहेत. ती अशी : दाऊद इब्राहीम, शेख दाऊद हसन, अब्दूल हमीद अब्दूल अजीज, अनिस इब्राहीम, अजिज दिलीप, दाऊद हसन शेख इब्राहीम कासकर, दाऊदइब्राहीम मेमन कासकर, दाऊद हसन इब्राहीम कासकर, दाऊद इब्राहीम मेमन, दाऊद सबरी, कासकर दाऊद हसन, शेख महंमद इस्माईल अब्दूल रहमान, दोऊद हसन शेख इब्राहीम, शेख इस्माईल अब्दूल आणि हजरत. भारतातील कारभार छोटा शकीलकडेदाऊद इब्राहीमचे भारतातील सिंडिकेट छोटा शकील पाहतो. दक्षिणअफ्रिकेतील रहमत नावाचा एक व्यक्ती सध्या छोटा शकीलला सहकार्य करतो.

Share Now

Leave a Reply