Homeब्रेकिंग न्यूजपक्ष सोडायला भाग पाडू नका, एकनाथ खडसेंचा इशारा

पक्ष सोडायला भाग पाडू नका, एकनाथ खडसेंचा इशारा

Deal of the Day:10,999.00

जळगाव :  नाथाभाऊंनी कोणता भ्रष्टाचार केला असेल तर सरकारने तो जनतेसमोर दाखवावा! मला आता उत्तर हवं आहे. पक्ष सोडण्याची शून्य इच्छा आहे, पण… मला पक्षाबाहेर ढकलले जात आहे. मला पक्ष सोडायला भाग पाडू नका, अशा शब्दांत माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत दिले आहेत.रावेर येथे एका कार्यक्रमात एकनाथ खडसे बोलत होते. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण,  माजी खासदार ईश्वर जैन,आमदार हरिभाऊ जावळे, आमदार भाई जगताप  आणि खासदार रक्षा खडसे आदी उपस्थित होते. खडसे यांनी चव्हाण यांच्यासमोर मनातली सल व्यक्त करतानाच भाजप नेतृत्वावर टीकाही केली.’गेल्या ४० वर्षापासून मी पक्षाशी एकनिष्ठ आहे. तरीही माझा न्याय होत नाही. मी गुन्हेगार असेल तर तुरुंगात टाका. भ्रष्टाचार केला असेल तर कारवाई करा. माझी भाजप सोडण्याची अजिबात इच्छा नाही. पण पक्षच दूर लोटत असेल तर पर्याय नाही. राजकारणात काहीही अशक्य नसते,’ असा इशाराही खडसे यांनी दिला.यावेळी खडसे यांनी  हिंदी सिनेमातील गाणं म्हणत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ‘रहते थे कभी जिनके दिल में, हम जान से भी प्यारों की तरह, बैठे हैं उन्ही के कूंचे में हम, आज गुनहगारों की तरह,’ अशा ओळी त्यांनी बोलून दाखविल्या. यावेळी अशोक चव्हाण यांनीही ‘भाजपमध्ये खडसेंची अवस्था  हमे तो अपनोने लुटा,’ अशी झाल्याचं दिलवाले सिनेमातील डायलॉगने त्यांना काँग्रेस प्रवेशाची ऑफर दिली.
 

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular