ब्रेकिंग न्यूज

पुणे : आर .पी .आय .नगरसेविका फरजाना आयुब शेख यांचे नगरसेवक पद रद्द

Advertisement

नगरसेविका फरजाना आयुब शेख यांचे नगरसेवक पद  २७/७/२०१७ रोजी रद्द करण्यात आले आहे .
पुणे : पुणे शहरातील येरवडा भागामधील  नगरसेविका फरजाना आयुब शेख यांनी सन २०१७ साली  नगरसेवक पद साठी निवडणूक लढवली होती व जिंकून ही आले होते .निवडणूकीसाठी त्यांनी त्यांच्या माहेरी असलेल्या नावाने व माहेरच्या कागद पत्रावर निवडणूक लढवली असून त्यांनी  निवडणूकीसाठी दर्जी (इ.मा.व.)या जातीचे असल्याचा दावा केला होता तो दावा जात पडताळणी समिती ने फेटाळून लावून  तो दाखला अवैध ठरवला  होता  . फरजाना शेख  यांचे जातीचे मूळ प्रमाणपत्र जप्त करण्याची कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल समितीस सादर करण्याचे आदेश  पडताळणी समिती ने दिले होते .
त्याची दखल घेत पुणे महानगर पालिका आयुक्त कुणाल कुमार यानी आज सायंकाळी स्वाक्षरी करून फरजाना शेख यांचे नगरसेवक पद २७/७/२०१७ रोजी  रद्द केले असल्याची माहिती मिळाली *
 

Share Now

Leave a Reply