सनाटा प्रतिनिधी :आज दिनांक १ ऑक्टोबर रोजी पुण्यातील कौन्सिल हॉलवर मुस्लीम समाजाचे धरणे आंदोलान झाले ,गुजरातमधील सोनू धनगर या महिलेने जाणून बुजून मोहम्मद(स) पैगंबर याच्या विरोधात अपशब्द काडून त्याचे विडीओ बनवून वायरल केले होते.या सर्वांमागे त्याचा एकच उद्देश दिसत होता कि हिंदू व मुस्लीम समाजात तेड निर्माण करणे.व मुस्लीम समाजाच्या भावना दुखावणे,या सोनू धनगरवर कठोर कारवाई व्हावी व दोन समाजात तेड निर्माण होऊ नये म्हणून या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
हे आंदोलान संपल्यानंतर मुस्लीम समाजातील तरुणांनी लोकशाही मार्गाने सोनू धनगरच्या फोटोवर थुंकून आपले राग व्यक्त केले.या आंदोलनाचे आयोजन चांदतारा चौक युथ फौंडेशन ,जमात ए उल्माए हिंद व पोपुलर फ्रंटच्या वतीने करण्यात आले होते.या आंदोलनात एम आय एम चे अंजुम इनामदार, जमात ए उल्माए हिंदचे मोलाना, पोपुलर फ्रंटचे यासीन पिरजादे, चांदतारा चौक युथ फौंडेशनचे अध्यक्ष शोएब शेख,व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
[ngg_images source=”galleries” container_ids=”8″ display_type=”photocrati-nextgen_basic_thumbnails” override_thumbnail_settings=”0″ thumbnail_width=”240″ thumbnail_height=”160″ thumbnail_crop=”1″ images_per_page=”4″ number_of_columns=”4″ ajax_pagination=”1″ show_all_in_lightbox=”1″ use_imagebrowser_effect=”1″ show_slideshow_link=”1″ slideshow_link_text=”[Show slideshow]” template=”/home/sanata2836/public_html/wp-content/plugins/nextgen-gallery/products/photocrati_nextgen/modules/ngglegacy/view/gallery.php” order_by=”sortorder” order_direction=”ASC” returns=”included” maximum_entity_count=”500″]