Homeब्रेकिंग न्यूजमिलिंद एकबोटे ,संभाजी भिडेवर गुन्हा दाखल

मिलिंद एकबोटे ,संभाजी भिडेवर गुन्हा दाखल

सनाटा न्यूज : भीमा कोरेगाव हिंसे प्रकरणी हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे,शिव प्रतिष्ठानचे  संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात खुनी हल्ला,दंगल,अॅट्रोसिटी,हत्यारबंदीचे उल्लंघन केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.अनिता साबळे या महिलेच्या तक्रारी वरून हे गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपासासाठी प्रकरण शिरूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात येणार आहे. हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे,शिव प्रतिष्ठानचे  संभाजी भिडे गुरुजी यांच्या कार्यकर्त्यांनी दंगल भडकावली असे आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉ.प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला होता.त्यानंतर आता मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular