व्याजाची मुद्दल न दिल्याने आरोपींनी जीवे ठार मारले
पुणे; येरवडा भागातील रहिवासी अमीर उर्फ लाल्या रहीम खान वय 28 रा. जयप्रकाशनगर याने एका वर्षा पूर्वी नमूद इसम विजय गायकवाड व अजय गायकवाड याच्या कडून 1 लाख रुपये 30 टक्के व्याजाने घेतले होते.त्यापैकी आमिरने 50 हजार रुपये फेडले होते.बाकीच्या रकमेवर तो दर महिना 30 टक्के दराने व्याज देत होता.व्याजाची रक्कम व मुद्दल परत पाहिजे या कारणावरून अजय हा आमिरच्या सतत मागे लागला होता.पण अमीर यास ती रक्कम देणे जमत नसल्याने अजय किरकिरी करून त्यास त्रास देत होता.अमीर व त्याचा भाऊ समीर याने त्याला खूप वेळा समजाऊन सांगितले कि जसे पैसे येईल पूर्ण रक्कम फेडू पण या अजयला काही दम निघत नव्हता.
दिनांक १ ऑक्टोबर रोजी अजय आपल्या भावासहित हातात लोखंडी पाईप घेऊन आमिरला जीवे मारण्याच्या उद्देशाने आला व आमीरला लोखंडी पाईपने व लाथा बुक्याने गायकवाड बंधूंनी मारहाण करणे शुरुवात केली. त्या पाईपचे फटके आमिरच्या डोक्यात बसल्याने आमीर हा मरण पावला.याच्या विरोधात समीर खान याने येरवडा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली आहे. या प्रकरणात पोलिसांनी अजय उर्फ बाळा मोतीराम गायकवाड वय 28 ,राजेश मोतीराम गायकवाड वय 38,विजय मोतीराम गायकवाड वय 34,किशोर मोतीराम गायकवाड वय 36 सर्व रा.गांधी नगर येरवडा पुणे या सर्वांना पोलिसांनी अटक करून त्याच्यावर भा.द.वी.कलम,302,506 (2)323,504,34 प्रमाणे गुन्हे दाखल केले आहे.या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस व्ही बोबडे हे करत असल्याची माहिती मिळाली आहे.
हि पण बातमी वाचा:६१९ रुपयात गोल्ड प्लेटेड नेकलेस.
[ngg_images source=”galleries” container_ids=”7″ display_type=”photocrati-nextgen_basic_thumbnails” override_thumbnail_settings=”0″ thumbnail_width=”240″ thumbnail_height=”160″ thumbnail_crop=”1″ images_per_page=”4″ number_of_columns=”4″ ajax_pagination=”0″ show_all_in_lightbox=”0″ use_imagebrowser_effect=”0″ show_slideshow_link=”1″ slideshow_link_text=”[Show slideshow]” template=”/home/sanata2836/public_html/wp-content/plugins/nextgen-gallery/products/photocrati_nextgen/modules/ngglegacy/view/gallery.php” slug=”http:–sajagnagrikktimes.com–page_id-2″ order_by=”sortorder” order_direction=”ASC” returns=”included” maximum_entity_count=”500″]