शहरात मोकाट जनावरे व कुत्र्यांचा सुळसुळाट

पिपरी चिंचवड शहरात मोकाट जनावरे व कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आयुक्तांना दिले निवेदन.
सनाटा प्रतिनिधी :पिंपरी चिंचवड शहरात मोकाट जनावरे व कुत्र्यांच्या त्रासामुळे नागरीक हैराण झाले आहेत.जनावरांचे मालक जनावरांना मोकळे सोडून देतात हे जनावरे रस्तावर येऊन बसतात व रस्त्याच्या कडेला असलेल्या कचराकुंडीवर चरतात यामुळे ट्राफीक जाम होते. तसेच पादचारी शाळकरी मुले, जेष्ठ नागरीक यांच्या अंगावर धावून जाण्याने अनेक अपघात झाले आहेत.कचराकुंड्यावर भटक्या कुत्रे त्याच ठिकाणी असल्याने अनेक नाकरीकांना व लहान मुलांना चावल्याच्या घटना घडल्या आहेत. यावर पिंपरी चिंचवड महानगरपालीकेच्या वतीने त्वरीत कारवाई करावी. जनावरे मोकाट सोडणा-या मालकावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत व भटक्या कुंत्र्यांचा योग्य बंदोबस्त करुन त्यांचे गनना करुन लक्षिकरण करण्यात यावे असे निवेदन मानवी हक्क संरक्षण व जागृतीचे राष्ट्रीय अध्यक्ष विकास कुचेकर संस्थेचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी महानगरपालीका आयुक्तांना देवून मागणी केली आहे. यावेळी संस्थेचे शहर उपाध्यक्ष विकास शाहाने,अँड.सचिन काळे,मुरलीधर दळवी,अरुण मूसळे आधी पदाधिकारी उपस्थित होते.

Support our journalism - Support Sajag Nagrikk Times

Leave a Reply