पुणे मीडिया वॉच व १५ ऑगस्ट चौक यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे कॅन्टोन्मेंट भागातील सोलापूर बाजारमधील सारनाथ बौध्द विहाराचे अध्यक्ष विजय गायकवाड यांना स्मृतींचिन्ह देउन पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष अतुल गायकवाड यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले . पुणे लष्कर भागातील सोलापूर बाजारमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा झाला . या सोहळ्यास पुणे मीडिया वॉचचे संचालक महेश जांभुळकर , १५ ऑगस्ट चौकाचे अध्यक्ष निलेश कणसे , बौध्दाचार्य अविनाश जगताप , प्रविण गाडे , निवृत्त पोलिस अरुण गायकवाड , महिलाध्यक्ष वर्षा गाडे , सुरेंद्र साळवी , राजेश संकपाळ , कुणाल जाधव , राजेश गाडे आदी मान्यवर उपस्थित होते .
या लिंक वर क्लिक करून फेसबुक पेजला लाईक करूनही बातम्या मिळवू शकता
सारनाथ बौध्द विहार हे पुणे लष्कर भागातील जुने बौध्द विहार असून या विहारामार्फ़त विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात . तसेच धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते , दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येते . त्यामुळे या विहारास पुरस्काराने सन्मानित आले .