हडपसर पोलीस ठाण्यातील दोन पोलीसांवर ACB ची कारवाई

सनाटा प्रतिनिधी ; पुणे शहर पोलीसांवर कधी चोरीचे तर कधी खंडणीचे गुन्हे दाखल होत आहे तर कधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई सुरू आहेत. पोलीसच जनतेचे भक्षक बनत असतील तर नव्याने जन्माला येणारी नवि पिडी वर नक्कीच याचे दुषपरिणाम होतील.  असाच एक प्रकारे  हडपसर पोलीस ठाण्यातील  दोन पोलीसांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई करण्यात आली. एक 28 वर्षाच्या  पुरूष तक्रारदार अपघातातील मोटरसायकल सोडविण्यासाठी गेले असता हडपसर पोलीस ठाण्यातील नारायण  ज्ञानदेव गोरे वय 41  व जगदिश बाबासाहेब कोंडाळकर  वय 45  यांनी तक्रारदाराकडे 5000 रूपयाची लाच मागितली होती.

ब्याटरिवर चालणाऱ्या रिक्षा व टेम्पोची अधिक माहिती साठी या लिंकवर क्लिक करा 

तक्रारदाराला ती लाच दयाची नसल्याने तक्रारदाराने पुणे शहर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली .त्याची शहानिशा करून पुणे शहर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ट्रॅप लावला होता. आरोपींना संशय असल्याने त्या दोघांनी रक्कम स्विकारली नाही .परत ट्रॅप लावला असता पैसे घेताना रंगेहात धरण्यात  आले असुन संबंधित पोलीसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

Advertisement

 

Support our journalism - Support Sajag Nagrikk Times

Leave a Reply