News Updatesपुणे

घरगुती गॅस सिलेंडर विक्रीत एजन्सी चालकांची मनमानी , प्रत्येक ग्राहकांकडून 10 ते 20 रुपये एक्स्ट्रा वसूल

Advertisement

Gas agency news : भारती ग्राहक मध्यवर्ती सहकारी भंडारा गॅस एजन्सीच्या कर्मचारींचा प्रताप,

Bharati Madhyawarti Sahakari Grahak Bhandar L Bibvewadi gas agency news

Gas agency news : सजग नागरिक टाइम्स : पुणे शहर करोनामुळे गेल्या चार महिन्यांपासून लॉकडाऊनमध्ये आहे.

नागरिकांची उपासमार होत असल्याच्या कारणांनी केंद्र सरकारने ही गरीब नागरिकांना उज्ज्वला योजने अंतर्गत मोफत गँस उपलब्ध करून देण्याची घोषणा ही केली.

पण स्थानिक गॅस एजन्सी मालक व कामगार यांच्या नफेखोर भूमिकेमुळे नागरिकांची राजरोसपणे लूट होत असल्याचे ग्राहक हक्क संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी समोर आणले आहे.

डिवटीवर दारु पिणा-या पुणे मनपाच्या सुरक्षा अधिका-याला कोविड योद्धा चे प्रमाण पत्र देण्याची मागणी.

बिबवेवाडी येथिल भारती ग्राहक भंडारा गॅस एजन्सी चे कर्मचारी 597.00 रुपयाचे सिलेंडर 610 ते 620 रुपयात विकत होते अशी माहिती संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली.

काल 25 जुलै रोजी भारती ग्राहक मध्यवर्ती सहकारी भंडारा गॅस एजन्सी चे कर्मचारी

हे ग्राहकांना 597 रुपये रेट असलेली पावती देऊन 610 ते 620 रुपये घेत असल्याचे स्टिंग ऑपरेशन संघटनेने केले .

Advertisement

प्रत्येक सिलेंडरवर आम्ही अतिरिक्त शुल्क घेतो असे बिनधास्त पणे व्हिडियोत बोलताना कर्मचारी दिसत आहे .

VIDEO

जर 20 रुपये प्रतेकाकडून जास्त घेत असतील तर दिवसाला जरी 100 सिलेंडर विकले तर रोजचे 2000 रुपये होतात व महिन्याचे 60,000 रुपयाची लुट हि एजन्सी करत आहे .

संबंधित गँस एजन्सी चालक साळुंखे यांना फोन द्वारे संपर्क केला असता,

ग्राहक स्वखुशीनं वाहतूक खर्च 10 ते 20 रुपये देत आहेत असे सांगण्यात आले.

तसेच कामगारांना अतिरिक्त शुल्क न देता सिलेंडर हवा असल्यास

आपण स्वतः गँस गोडाऊन मधून सिलेंडर घेऊन जावा आम्ही घरपोच सिलेंडर देणार नाही असा दम हि एजन्सी धारकाने दिला .

अश्या मुजोर व लुटारू ग्यास एजन्सीवर कठोर कारवाई करून त्याचा परवाना रद्द करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

 LOCKDOWN च्या काळात cyber crime मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ 

Share Now