Homeताज्या घडामोडीदहावीचा निकाल जाहीर, उद्या २ जूनला लागणार निकाल

दहावीचा निकाल जाहीर, उद्या २ जूनला लागणार निकाल

सजग नागरिक टाइम्स:

उद्या २ जूनला दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांना website वर जाऊन १० च्या निकालाची ऑनलाईन प्रिंटआऊट काढून घेता येणार आहे.

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (२ जून ) दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाणार असल्याची अधिकृत घोषणा राज्य मंडळातर्फे करण्यात आली.

राज्य मंडळाने इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली. दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते.

त्यात ८ लाख ४४ हजार ११६ मुले आणि ७ हजार ३३ हजार ०६७ मुलींचा समावेश होता.

राज्यभरातील ५ हजार ३३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती. दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याची उत्सुकता लागली होती. मात्र, आता निकालाची तारीख जाहीर झाली आहे. २ जूनला निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांना website वर जाऊन निकालाची ऑनलाईन प्रिंटआऊट काढून घेता येणार आहे.

१० वी परीक्षेचा निकाल mahasscboard.in आणि mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध होणार आहे.

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular