Homeताज्या घडामोडीआमदार आणि पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचं निधन

आमदार आणि पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचं निधन

Sajag Nagrikk Times: कसब्याचे आमदार आणि पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचं दीर्घ आजारानं आज गुरुवारी निधन झालं . गेल्याकाही महिन्यांपासून त्या कर्करोगाशी लढत होत्या ,

अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली . अनेक दिवसांपासून पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते , याच ठिकाणी त्यांनी दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला .

उद्या सकाळी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेता येईल त्यानंतर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत .

पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघाच्या त्या भाजपच्या विद्यमान आमदार होत्या.

Share Now
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments