विद्यार्थी सेवा संघाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वार्षिक स्नेह संमेलन व विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न
स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण यांनी स्थापन केलेल्या विद्यार्थी सेवा संघाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वार्षिक स्नेह संमेलन व विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते .पुणे कॅम्पमधील नेहरू मेमोरियल हॉलमध्ये होणाऱ्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिध्द सिनेअभिनेता विवेक ओबेरॉय यांच्याहस्ते विद्यार्थ्यांचा सन्मानित करण्यात आले . तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे , आमदार जयदेवराव गायकवाड ,विद्यार्थी सेवा संघाचे विश्वस्त कनव वसंतराव चव्हाण ,विद्यार्थी सेवा संघाचे अध्यक्ष ऍड. आनंद मोहन चव्हाण ,कार्याध्यक्ष विनोद निनारिया , माजी आमदार कृष्णा हेगडे , महेश तपासे , रामू पवार , नगरसेविका राजश्री काळे , मोतीलाल निनारिया , नरोत्तम चव्हाण , विश्वास चव्हाण ,बंडू चरण , नरेश जाधव , मनोज पटेलिया, रवी परदेशी , उपस्थित होते .यावेळी कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना विद्यार्थी सेवा संघाचे अध्यक्ष ऍड. आनंद मोहन चव्हाण यांनी सांगितलॆ कि , सन १९६७ साली सुरु करण्यात आलेली मेहेतर वाल्मिकी समाजातील विशेष नैपुण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो . या संघाची सुरुवात समाजसुधारक स्व. विठ्ठलदास चव्हाण , माजी नगरसेवक स्व. केशवकांत जानजोत , समाजसुधारक स्व. मनोहर लालबिगे , समाजसुधारक स्व. बाबुलाल मुलतानी व स्व. माजी खासदार वसंतराव चव्हाण यांनी समाजात शैक्षणिक महत्व पटवून देण्यासाठी आणि समाज उन्नतीसाठी या विद्यार्थी सेवा संघाची स्थापना केली .यंदाच्या वर्षी सुमारे एक हजार विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला . या विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य , रोख पारितोषिके, स्मृतिचिन्ह देण्यात आले .सहावी ते दहावी , बारावी , पदवीधर , उच्च पदवीधर विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले .
[ngg_images source=”galleries” container_ids=”17″ sortorder=”91,90″ display_type=”photocrati-nextgen_basic_thumbnails” override_thumbnail_settings=”1″ thumbnail_width=”400″ thumbnail_height=”580″ thumbnail_crop=”1″ images_per_page=”2″ number_of_columns=”3″ ajax_pagination=”1″ show_all_in_lightbox=”1″ use_imagebrowser_effect=”0″ show_slideshow_link=”1″ slideshow_link_text=”[Show slideshow]” template=”/home/sanata2836/public_html/wp-content/plugins/nextgen-gallery/products/photocrati_nextgen/modules/ngglegacy/view/gallery-caption.php” order_by=”sortorder” order_direction=”ASC” returns=”included” maximum_entity_count=”500″]
यावेळी प्रसिध्द सिनेअभिनेता विवेक ओबेरॉय यांनी सांगितले कि समाजसेवा करणे अवघड गोष्ट आहे , स्वतःसाठी काही फायदा न करता समाजासाठी मदत व पैसे एकत्र करणे अवघड असते . देशात अनेक गरीब गरजू नागरिक आहेत त्यामुळे आपापल्या कुवतीनुसार दररोज त्यांच्यासाठी एक चांगले केल्यास लोकसंख्येनुसार प्रत्येक दिवशी १२५ कोटी कामे गरजू लोकांची होतील . आयुष्यात अडचणींबद्दल विचार केला तेव्हा त्या सुटल्या नाहीत , परंतु उत्तराबद्दल विचार केला तेव्हा सर्व अडचणी सुटत गेल्या . हाच विचार करून मी पंधरा वर्षांपासून समाजसेवेत कार्यरत आहे . समाजासाठी संपूर्ण जीवन व्यथित करणे हा मोठा संघर्ष आहे . देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी सात कोटी नागरिक दिव्यांग असून काही वेळा त्यांची हेटाळणी होते . तर अनेक जण त्यांच्याकडे सहानुभूतीपूर्वक पाहतात त्यामुळे दिव्यांग लोकांच्या केवळ शारीरिक समस्या नसून सामाजिक समस्याही खूप आहेत . आयुष्यात ९९ टक्के स्वतःसाठी आणि एक टक्का समाजासाठी काम करा . कारण कोणत्याही कामाची सुरुवात स्वतःपासून केल्यावरच मार्ग सापडतो . देवदूत आभाळातून येत नसतात आपण सर्व जण देवदूत बनू शकतो , फक्त विचार आणि प्रत्यक्ष कृती यामधले अंतर पार करायचे आहे .
यंदाच्या वर्षी समाजातील दोन समाजसेवकांचा समाजभूषण पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले . यामध्ये पुणे महापालिका शिक्षण मंडळ माजी उपाध्यक्ष नारायण सारवान व महात्मा फुले महामंडळ व्यवस्थापकीय संचालक राकेश अमीरचंद बेद यांना स्मृतिचिन्ह , मानपत्र , शाल व श्रीफळ देउन सन्मानित करण्यात आले .
यावेळी
यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी सेवा संघाचे कार्याध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक विनोद मोतीलाल निनारिया यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी सेवा संघाचे विश्वस्त वृक्ष संवर्धन समितीचे सदस्य कविराज संघेलिया यांनी केले तर आभार धनराज जावा यांनी मानले .