ताज्या घडामोडीपुणे

दरोडा टाकुन फरार झालेले आरोपी ६ तासाच्या आत जेरबंद

Advertisement

लोणीकाळभोर पोलीस स्टेशन च्या हद्दीमध्ये दि.२२/११/२०२२ रोजी संध्याकाळी ऊरुळीकांचन परीसरामध्ये सहा दराडेखोरांनी एका चायनीस हॉटेलवर प्राणघातक हत्यारानीशी दरोडा टाकुन हॉटेल मालकास मारहाण करुन त्याचे गल्यामधील रोख रक्कम लंपास करून फरार झाले होते. \

हॉटेल मालक अजिंक्य सतिश कांचन रा. दत्त नगर ऊरुळीकांचन पुणे यांचे फिर्यादी वरून सहा दरोडेखोरांच्या विरोधामध्ये लोणीकाळभोर पोलीस स्टेशन पुणे येथे गुर नं ५९८/२०२२ भा. द. वि. कलम ३९७, ३२३, ५०४, ५०६ सह भारतीय हत्यार कायदा क. ४ (२५), म.पो. का. कलम ३७ ( १ ) सह १३५, क्रिमीनल लॉ अमेनमेंट कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने व फरार आरोपीतांनी सदर भागामध्ये दहशत पसरवील्यामुळे मा. दत्तात्रय चव्हाण वरीष्ठ पोलीस निरीक्षक सो, यांनी तपास पथकातील पोउपनि अमित गोरे व पोलीस अंमलदार यांना सदरबाबत आदेशित केले असता फरार आरोपीतांचा शोध घेत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार निखील पवार यांना त्याचे बातमीदारा मार्फत खात्रीशिर बातमी मिळाली की, दाखल गुन्ह्यातील आरोपी हे हांडेवाडी रोड येथील भारत पेट्रोल पंपाचे पाठीमागे असलेल्या एका बंद गोडावून मध्ये लपुन बसले आहेत अशी बातमी मिळालेवरुन सदरबाबत पोउपनि गोरे यांना कळवले असता त्यांनी

Advertisement

वरीष्ठ पोलीस निरीक्षक सौर यांना सदर बाबत कळवून त्यांनी बातमीची खात्री करून कारवाई करणेकामी आदेशीत केल्याने पोहवा गायकवाड, पोहवा पाटोळे, पोना नागलोत, पोना देविकर, पो ना जाधव, पोशि कुदळे, पोशि पवार पोशि पुंडे, पोशि सोनवणे असे सदर ठिकाणी जाऊन मिळाले बातमीप्रमाणे खात्री केली असता हांडेवाडी रोड लगत भारत पेट्रोल पंपाचे मागे एका बंद गोडावूनचे आत बातमी प्रमाणे पाच इसम लपुन बसलेले दिसुन आले म्हणुन वरील प्रमाणे तपास पथकातील स्टाफ सदर इसमांना पकडण्यासाठी गेले असता त्यांना चाहुल लागल्याने ते तेथुन पळुन जावु लागले, तेव्हा त्यांचा पाठलाग करुन त्यांना थोडयाच अंतरावर शिताफीने पकडले.

पकडलेल्या इसमांस त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्यांचे नाव व पत्ता ( १ ) सुमित ऊर्फ विलास दत्ता खवळे वय १६ वर्षे, रा. बँक ऑफ बडोदाचे पाठीमागे, सासवड रोड, सातवाडी, हडपसर, पुणे (२) रोहन राजकुमार गायकवाड, वय १७ वर्षे रा कुडके हाईटस समोर, गोंधळेनगर, हडपसर, पुणे, मुळ रा. गंगापुर, उदगीर जि. लातुर (३) करण संदीप चिकणे, वय- १९ वर्षे धंदा- मजुरी, रा. सरस्वती क्लास समोर, सातवाडी, राहुल कॉलनी, हडपसर, पुणे, मुळ रा. पारगाव मेमाणे ता. पुरंदर जि.पुणे ( ४ ) हनुमंत सोपान हाके, वय १७ वर्षे, रा. सरस्वती क्लास समोर, सातवाडी, राहुल कॉलनी, हडपसर, मुळ रा. वरळे गाव ता.सोलापुर जि. सोलापुर (५) समाधान वैजनाथ बाबळसुरे, वय-२० वर्ष, धंदा मजुरी, रा. घर नं १२ नटराज कॉलनी, गोंधळेनगर, हडपसर, पुणे, मुळ रा.बाजार पेठाचे पाठीमागे, किल्लारी, ता. औसा जि.लातुर (६) अनिकेत गुलाब यादव वय १९ वर्षे रा. पठारेवस्ती लोणीकाळभोर पुणे असे असल्याचे सांगुन सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

सदरचे आरोपी हे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून पोलीस तपासामध्ये त्यांचे कडुन अजुन गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि धायगुडे, लोणीकाळभोर पो स्टे पुणे हे करत आहेत.

Share Now