[popup id=”सनाटा जाहिरात ऑफर” title=”जाहिरातीसाठी संपर्क;8055306463″ theme_id=”1172″ size=”medium” width_unit=”px” height_unit=”px” location=”center top” position_right=”0″ position_left=”0″ position_bottom=”0″ position_top=”100″ animation_type=”fade” animation_speed=”250″ animation_origin=”center top” overlay_click=”1″]ANY INCOURY CLICK HERE
बातम्या मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा[rainmaker_form id="1896"]
[/popup]
पुणे पोलिसांची 9 महिन्यात १६ गुन्हेगारावर मोका अंतर्गत कारवाई
सनाटा प्रतिनिधी :पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशन हद्दीत राहणारा अट्टल गुन्हेगार सागर सुनील गायकवाड वय २९ ,रा.गोसावी वस्ती कर्वेनगर पुणे हा अभिलेखावर सराईत गुन्हे करणारा गुन्हेगार आहे.या सराइताणे त्याच्या साथीदारा सोबत वारजे माळवाडी व अलंकार पोलीस ठाणे हद्दीत खुनाचे प्रयत्न व जवळ चाकू,कोयता बांबू अश्या जीवघेण्या ह्त्याराचा वापर करून नागरिकाना दुखापत केली आहे.याच्यावर दरोडा ,जबरी चोरी,घातक शस्त्र जवळ बाळगणे यासारखे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत.या सागरची गुन्हेगारी २०१० साला पासून चालू आहे.
हे पण जरूर पहा ;सनाटा जाहिरात धमाका
[ngg_images source=”galleries” container_ids=”15″ display_type=”photocrati-nextgen_basic_thumbnails” override_thumbnail_settings=”0″ thumbnail_width=”240″ thumbnail_height=”160″ thumbnail_crop=”1″ images_per_page=”4″ number_of_columns=”4″ ajax_pagination=”1″ show_all_in_lightbox=”1″ use_imagebrowser_effect=”1″ show_slideshow_link=”1″ slideshow_link_text=”[Show slideshow]” template=”/home/sanata2836/public_html/wp-content/plugins/nextgen-gallery/products/photocrati_nextgen/modules/ngglegacy/view/gallery.php” order_by=”sortorder” order_direction=”ASC” returns=”included” maximum_entity_count=”500″]
याच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा ५६(१)(ब)प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करून सुधा काहीही फरक न होता त्याचे गुन्हेगारी कृत्य चालूच होते.परिसरातील नागरिकांना दहशती खाली जगावे लागत असून कायदा सुव्यवस्था निर्माण झाली होती .तसेच जीवितास धोका होईल व मालमत्तेचे नुकसान होईल या भीतीमुळे त्याच्या विरोधात उघडपणे तक्रार देण्यास नागरिक घाबरत होते. परिसरात शांततामय वातावरण रहावे व नागरिक दहशत मुक्त जगावे म्हणून पोलीस सहआयुक्त रवींद्र कदम याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे,खांडेकर वारजे माळवाडी पोलीस स्टेशन,यांनी एम पी डी ए कायद्या अंतर्गत सागर सुनील गायकवाड वय २९ ,रा.गोसावी वस्ती कर्वेनगर यास स्थानबद्ध करण्यासाठी प्रस्ताव तयार करून पोलिस आयुक्त पुणे शहर यांच्याकडे सादर केला होता. रश्मी शुक्ला पोलिस आयुक्त पुणे शहर यांनी प्रस्तावाची पडताळणी करून सागर सुनील गायकवाड याच्या विरुध्द २८ सप्टेंबर रोजी एम पी डी ए कायद्या अंतर्गत एक वर्षा करिता स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केले असून त्यानुसार सागरला कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करून ठेवण्यात येत आहे.व गेल्या नऊ महिन्यात अश्या गुन्हेगारी वृत्तीच्या १६ जणांना एम पी डी ए कायद्या अंतर्गत स्थानबद्ध केले असल्याची माहिती मिळाली आहे.