सजग नागरिक टाइम्स:नवीन उद्योजकामध्ये नवीन कौशल्य घडविण्यासाठी स. प. महाविद्यालयातर्फे मेवेन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे . महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉलमध्ये गुरुवार दिनांक १८ जानेवारी २०१८ ते शनिवार २० जानेवारी २०१८ दरम्यान तीन दिवस हि परिषद चालणार आहे . या परिषदेचे उदघाट्न महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याहस्ते करण्यात येणार आहे . यावेळी प्रमुख पाहुणे जेष्ठ पत्रकार सुनील माळी , शिक्षण प्रसारक मंडळाचे व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष ऍड. सोहनलाल जैन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत .
या उदघाटनानंतर विद्यार्थ्यांना उदयोजक विषयी प्रेरणा देणारे प्रमुख वक्ते नदीम काझी हे मार्गदर्शन करणार आहेत . परिषदेच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रामध्ये पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांचे युवकांसाठी कौशल्य विकासावर मार्गदर्शन करणार आहेत . दुसऱ्या सत्रात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष योगेश ठाकूर हे कौशल्यावर आधारित रोजगार निर्मिती या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत . त्यानंतर लघुउदयोजकातून यशस्वी वाटचाल या विषयावरील चर्चासत्रामध्ये बॉम्बे शेविंग कंपनीचे संस्थापक रौनक मुनोत , ऋचा यंत्राचे संस्थपाक रोहित दशरथी , चापर्सचे संस्थापक हर्षवर्धन पटवर्धन ,रुद्राचे संस्थापक मेधा ताडपत्रीकर , रिअल बूझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुळा नायर आदी मान्यवर सहभागी होणार आहेत . सायंकाळी चार वाजता महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे हे कौशल्य विकासावर आधारित अभ्यास या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत . त्यानंतर उद्योग करताना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय या विषयावर भूपेंद्रसिंग राठोड मार्गदर्शन करणार आहेत .परिषदेच्या तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात यशस्वी उदयोगाची गुरुकिल्ली या विषयावर रांका ज्वेलर्सचे संचालक फत्तेचंद रांका त्याचे अनुभव कथन करणार आहेत . त्यानंतर जे. आर. डी. प्रिंटपॅक प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका जान्हवी धारिवाल हे कौटूंबिक व्यवसाय जतन व वाटचाल या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत . त्यानंतर ए. के. स्टुडिओचे संचालक केदार आठवले हे ध्वनी मुद्रण या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत . दुपारच्या सत्रात करिअर वाटांचा शोध व कौशल्य विकास या विषयावरील चर्चासत्रामध्ये आय. एफ. सी. बी. ए.चे अध्यक्ष शंतनू भडकमकर , एस. ए. व्ही. केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक अंकिता श्रॉफ , पर्पल चायचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैशाली शर्मा , रेड एफ एम पुणे कार्यक्रम अधिकारी सोनिया पाठक चव्हाण , थॉटवर्क्सचे सुनील मुंद्रा आदी मान्यवर सहभागी होणार आहेत .दुपारच्या सत्रात युवकांच्या बदलत्या समजुती या विषयावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव श्रीकांत भारती मार्गदर्शन करणार आहेत . यावेळी प्रसिद्ध अभिनेते व निर्माते भाऊसाहेब शिंदे उपस्थित राहणार आहेत . सायंकाळच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत .