बुलेट मुळे होत आहे ध्वनी प्रदुषणात वाढ, RTO चे कानावर हात
RTO घालत आहे पाठिशी ; ध्वनी प्रदुषण मापन यंत्रणा उपलब्ध नाही
पुणे : सनाटा प्रतिनिधी ; आज शहरा मध्ये दिवसेंदिवस नवनवीन वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे परंतु त्याचे नियोजन व्यवस्थित होत नसल्याने वाहतूकीचा बोजवारा हुडत आहे वाहतूक कोंडी होत असल्याने वाहन चालकांकडून सारखं हाॅर्ण वाजवून कानाच्या कानठळया वाजत आहे. त्यात आणखीन भर महणजे बुलेटचे नविन फॅड बाजारात आले आहे. नागरिकांनी हाॅर्णचा वापर केला तरच ध्वनी प्रदुषणात वाढ होते परंतु बुलेटच्या आवाजात मोठी वाढ होत असल्याने पुणे RTO कडून सरासर दुर्लक्ष होताना दिसते. बुलेटचा सर्वाधिक त्रास महिलांना, लहान मुलांना आणि ज्येषठ नागरिकांना होत आहे बुलेट मुळे टवाळखोरीला हि उत आले आहे.
गेल्या 5 वर्षाचा सनाटा ने अढावा घेतला असता बुलेट मुळे ध्वनी प्रदुषणात वाढ होत आहे .तसेच आज पर्यंत एका हि बुलेट उत्पादकाला नोटिस बजावली नसल्याचे उघडकीस आले आहे.
ध्वनी प्रदुषणात वाढ करणाऱ्यास कारणीभूत ठरल्या प्रकरणी संबंधित बुलेट उत्पादकांवर कारवाई करण्याची मागणी लोकहित फाउंडेशन पुणे ने RTO कडे केली आहे..
[wp-rss-aggregator]