ताज्या घडामोडी

रेशन कार्डसाठी बोगस दाखले विकणारी टोळी सक्रीय*

Advertisement
शिधापत्रिके साठी बोगस दाखले विकणारी टोळी सक्रीय*
सनाटा प्रतिनिधी ; पुणे अन्न धान्य वितरण कार्यालया कडील  8 परिमंडल विभागाचे  आता नविन अध्यादेशा नुसार 11परिमंडल विभाग झाले आहे त्यात वाढले आहे एजंट राज? पुण्यातील शिवाजी नगर शासकिय गोदामातील एंजटा विरोधात नागरिकांना फसवल्या  संदर्भात  वारंवार तक्रार प्राप्त झाल्या आहेत त्याची दखल घेत शिवाजी नगर पोलीस स्टेशन कडून तात्पुरतं स्वरूपात का होईना कारवाई झाली होती . परंतु पोलीसांच्या कारवाईला खो, मिळाल्याने दिवसेंदिवस एंजटाची दखल वाढली आहे. त्यात आणखीन भर महणजे शिधापत्रिकेची बोगस नावे कमी करून दाखले विकणारी टोळी सक्रीय झाली आहे. याचा त्रास मात्र काहि परिमंडल अधिकारी यांना सोसावा लागत आहे नविन  शिधापत्रिकेसाठी आलेल्या काहि अर्जांचे संशय असल्यास सदरील कार्यालयाने  ते दाखले दिले आहे किंवा नाही हेच पाहण्यासाठी पाठविले जात असल्याने उशिरा पडताळणी करून दाखले ( अहवाल) येत असल्याने इतर अधिकारी यांची भंबेरी उडत आहे. हे दाखले विकणारी टोळीत  आतिलच कर्मचारी शामिल असल्यानेच सदरील दाखले बाहेर पडत असल्याचे सांगितले जात आहे या विषयात लवकरच वरिष्ठांनी लक्ष घालण्याची वेळ आली आहे..
*क्रमशः*

Share Now

Leave a Reply