ताज्या घडामोडी

वाहतूक पोलिसाला न्यायाधीशाच्या पति व मुलीने केली मारहाण

Advertisement

पुणे शहरातील कर्वे रोडवर वाहतुकीचे नियमन करनारया वाहतुक पोलिसाला मारहाण करण्यात आली असून मारहाण करणारे कोणी अडानी व्यक्ति नसून स्वताला उच्च शिक्षित समजनारे व इतरांना कायदे शिकवनारे आहे .मारहाण करनारे मुम्बईतिल एक न्यायाधिशाचे पति व् मुलगी आहे , व् ज्या वाहतुक पोलिसाला मारहाण करण्यात आली त्यांचे नाव पोलिस हवालदार रवि इंगले असून मारहाण प्रकरणी बाप व् लेकीला डेक्कन पोलिस स्टेशनमध्ये चौकशीसाठी  नेले आहे .बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास वाहतुक पोलिस हवालदार रवि इंगले कर्वे रोडवरील स्वतंत्र चौकात वाहतुकीचे नियमन करत होते .त्यावेळी न्यायाधिशाचे पति व् मुलगी त्यांच्या वाहनातून जात असताना त्यांनी नियम तोड्ल्याने रवि इंगले यांनी त्या महाशयांना नियमानुसार दंड भरन्यास सांगितले. मला कायदा शिकवतो का असे म्हणत चिडलेल्या पति महाशयांनी व् मुलीने वाद घातला तो वाद वाढल्याने त्याचे रूपांतर मारहाणीत झाले . या मारहानीची घटना सी सी टीवी मध्ये कैद झाली आहे .

Share Now

Leave a Reply