ताज्या घडामोडी

वाहतूक पोलीसाला मारहाण प्रकरणी अखेर न्यायाधिशचे पती व मुलीवर गुन्हा दाखल

Advertisement

वाहतूक पोलीसाला मारहाण प्रकरणात अखेर झाला गुन्हा दाखल*

Advertisement

सनाटा प्रतिनिधी ; डेक्कन वाहतूक विभागात कार्यरत असलेले वाहतूक पोलीस हवालदार रविंद्र इंगळे 16 ऑगस्ट रोजी कर्वे रोड येथे वाहतूक नियमन करत असताना स्वातंत्र चौक रोड येथे न्यायाधिशचे पती शाम विश्र्वासराव भदाणे व त्यांची मुलगी यांनी सिग्नल तोडल्यामुळे वाहतूक पोलीस इंगळे यांनी त्यांना थांबवून रितसर दंड भरून चलन करावे असे सांगितले. याचा राग भदाणे यांना आल्याने लाईसन्स हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला व दुचाकी वाहन अंगावर घातले त्याचा चाक पायावर चढलयाने इंगळे यांनी भदाणे यांना ढकलले याचा राग आल्याने भदाणे व त्यांची मुलगी यांनी मिळून इंगळे यांना मारहाण केली होती. याचे विडिओ सोशल मिडियावर वायरल झाले होते. आणि तर्क वि तर्क लढविले जात होते. नेमकि चुक कोणाची यावर ही चांगलीच चर्चा रंगून गुन्हा दाखल होणार का ? अशी काल पासुन चर्चा जोरात सुरू होती शेवटी त्या चर्चेला स्वल्पविराम मिळाले. शेवटी आज भदाणे व त्यांची मुलगीयांच्या विरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात भादविक 323,332, 353, 352, 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील गुन्हयाचा तपास पोलीस निरिक्षक गुन्हे अरूण आवहाळ करीत आहेत.

Share Now

Leave a Reply