Sanvidhan chowk : चौकास संविधान नाव देण्यास अडथळे आणणाऱ्यावर कडक कारवाईची मागणी
Sanvidhan chowk : सजग नागरिक टाइम्स : बातमी आहे सुरक्षानगर येथे संविधान चौथरा बांधण्यावरून सुरू झालेल्या वादाची…!
नगरसेवक आनंद अलकुंटे यांनी सुरक्षानगर येथे चौकास संविधान चौक नामकरण करून सुशोभीकरण पुणे मनपाच्या वतीने करून घेतले,
याबाबत एका मनुवाद्याने खोटी माहीती पोलिसांना दिली.
याचे भूमी पूजन 8मार्च रोजी आयोजित केले असता याठिकाणी हडपसर पोलीस स्टेशनच्या वतीने चौकाचे नामकरन व परवानग्याबाबत चौकशी करण्यात आली,
यावरून संतप्त बहुजन व आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी हडपसर पोलीस स्टेशनला घेराव घातला ,
या कार्यक्रमाविषयी चुकीची माहिती देत कामात अडथळा आणणाऱ्या अज्ञात मनुवादी इसमावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली,
नगरसेवक आनंद अलकुंटे तसेच बहुजन कार्यकर्त्यांनी हडपसर पोलीस स्टेशनला घेराव घालून निषेध व्यक्त केला.
पुरणपोळी दानउपक्रमास मोठा प्रतिसाद
यावेळी आरपीआयच्या पुणे शहर अध्यक्षा शशिकलाताई वाघमारे, हडपसर अध्यक्ष संतोष खरात, दत्ता कांबळे, वैशाली शिंदे,वामन जी,डॉ किशोर शहाणे,आदी उपस्थित होते.
यावेळी प्रसार माध्यमाशी बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांनी सांगितले की
कायदा सुव्यवस्था राखली जावी याकरिता चौक नामकरणबाबत घेतलेल्या प्रशासकीय परवानग्या तपासणे आमचे कर्तव्य आहे,
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये शांतता राखावी असे ही त्यांनी यावेळी सांगितले.
नगरसेवक आनंद अलकुंटे, शशिकला वाघमारे यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनि लिहिलेल्या संविधानामुळे आज आपण स्वाभिमानाणे जगत असून
संविधान नाव चौकास देण्यास विरोध करणाऱ्या मनुवादी प्रवृत्तीच्या इसमावर कडक कारवाई करावी अशी मागणी त्यानी यावेळी केली.
VIDEO NEWS : Hadapsar येथिल D P रस्त्यावर बांधकाम व्यवसायिकाने बांधले वॉलकंपाऊड
[…] […]
[…] […]