रेशनिंग किट मधील तेल चोरी संदर्भात पोलीसात तक्रार दाखल

YERWADA POLICE STATION : पुणे महानगरपालिकाच्या रेशनिंग किट मधील तेल चोरीची येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल.

पोलिसांच्या कारवाईकडे लागले लक्ष

RATION KIT OIL CHORI  COMPLAINT YERWADA POLICE STATION

YERWADA POLICE STATION : सजग नागरिक टाइम्स : प्रतिनिधी : कोरोना व्हायरसमुळे पुणे शहरातील बराच भाग कंटेनटमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.

नागरिकांना बाहेर पडता येत नसल्याने त्यांना अडीअडचणी व उपासमारी नको म्हणून पुणे महानगर पालिकेने पुण्यातील ब-याच भागात रेशनिंग किट वाटप करण्या संदर्भात निर्णय घेतला होता,

Advertisement

आणि त्या निर्णय प्रमाणे ठेकेदारा मार्फत किट वाटप करण्याचे आदेश होते.

परंतु काही ठिकाणी नगरसेवकांनी किटवर डल्ला मारून आप आपल्या जवळच्या नातेवाईकांना व मित्र मंडळीना वाटप केले?

तर काही ठिकाणी ज्या त्या क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी वाटप केले,

Advertisement

परंतु काही ठिकाणी किट सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचलेच नाही तर काही ठिकाणी १ किलो तेल च गायब झाल्याची तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या होत्या.

पुणे महानगरपालिकेने दखल न घेतल्याने पुण्यातील येरवडा भागातील सामाजिक कार्यकर्ते एजाज खान यांनी पोलीसांत तेल चोरीची तक्रार दाखल केली आहे.

पिस्टल व जिवंत काडतुस विनापरवाना बाळगणारे कटटा गँग चे गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात

Advertisement

कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालयात तेल चोरी संदर्भात वारंवार कळवून हि क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले असल्याने खान यांनी पोलीसांत तक्रार दाखल केली आहे.

महापालिकेच्या वतीने वाटण्यात आलेल्या रेशनिंग किट बाबतीत भरपूर गोंधळ निर्माण झाला आहे.

त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या हक्काचे तेलच गायब झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Advertisement

रेशनिंग किट मधील तेल कसे गायब झाले व ते कोणी गायब केले याची साधी चौकशीही कळस धानोरी क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले आहे का ?

यावर अधिकाऱ्यांनी मौन बाळगले असल्याने आणखीनच संशय निर्माण झाला आहे.

प्रति रेशनिंग किट मधील १ किलो तेल गायब झाले असतानाहि क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी स्वता किंवा कर्मचाऱ्यांन मार्फत पोलिसांत फिर्याद का दाखल केली नाही?

Advertisement

तक्रार करणे त्यांची जबाबदारी नव्हती का ? रेशनिंग किट वाटप करणारा तो ठेकेदार कोण याची चौकशी होणार का ? असे अनेक प्रश्न हि स्थानिक नागरिकांनी विचारले आहे.

आता येरवडा पोलिस ठाण्यात तेल चोरा विरोधात गुन्हा दाखल होणार का? व किती तत्परतेने सरकारी बाबू हालचाल करणार यावर नागरिकांचे लक्ष टिकून राहणार आहे.

नवले पुलाजवळील विचित्र अपघातात सात वाहनांचे नुकसान

Advertisement
Support our journalism - Support Sajag Nagrikk Times