सजग नागरिक टाइम्स: शुक्रवारी आज दि.17 जून रोजी दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला होता.
अशातच आता दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली होती.
महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकेंडरी अँड एज्युकेशन (MSBSHSE) मार्फत आज दहावीचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. बोर्डाने निकाल जाहीर केल्यानंतर, विद्यार्थ्यांना तो ऑनलाईन पाहता येणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर या लिंकवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन, झटपट कोणत्याही अडथळ्याविना निकाल पाहता येणार आहे.
दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी,
तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामुळे दहावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालक डोळे लावून बसले होते.
मंडळाकडून 20 जून पर्यंत निकाल जाहीर होईल असे सांगण्यात आले होते आणि त्यानुसार आज म्हणजे 17 जून रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होईल.
कुठे पाहाल निकाल?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर
निकाल जाहीर झाल्यानंतर कसा चेक कराल?
स्टेप 1 : http://mahresult.nic.in
https://ssc.mahresults.org.in
वर लॉन ऑन करा
स्टेप 2 : दहावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा
स्टेप 3 : तिथं असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका
स्टेप 4 : तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा
स्टेप 5 : एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल
स्टेप 6 : निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा.