Market yard pune: मृत महिलेचे नातेवाईक व नागरिक तिन दिवसांपासून पोलिस ठाण्यात तळ ठोकून.
Market yard pune: 13 ऑगस्ट रोजी मार्केटयार्ड आंबेडकर नगर येथे सकाळी सात ते आठ दरम्यान चूल पेटविण्याचा कारणावरून दोन शेजार्यामध्ये भांडणे झाली होती,
यासंदर्भात मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात परसपर विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून तीन जण अटकेत आहे,
सदर ठिकाणी भांडणे चालू असताना शबनुर रईस अनसारी या महिलेचा मृत्यू झाला आहे,
याबाबत मार्केटयार्ड पोलिसांची कसून चौकशी चालू असून पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर कोणत्या कलमाखाली कारवाई करायची ठरणार असल्याचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील कलगुटकर यांनी सांगितले आहे,
याबद्दल मयत अन्सारी च्या घरच्यांची व नातेवाईकांची मागणी आहे की विकी बनसोडे, शिवा बनसोडे व इतर आरोपींवर खुन केल्याबद्दल गुन्हा नोंदवावा व त्यांना अटक करावी,
हेपण वाचा : पूरग्रस्तांना मदतीसाठी नायब तहसीलदारांनी स्वता पाठीवर वाहून नेली अन्नधान्याची पोती,
व जोपर्यंत इतरांनाही अटक करणार नाही तोपर्यंत आम्ही बॉडी दफन करणार नाही,
अशी अन्सारी च्या घरच्यांची मागणी असून गेल्या तीन दिवसांपासून हे सर्वजण मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे तळ ठोकून बसले आहे.