Homeताज्या घडामोडीधर्माच्या भिंती ओलांडून वारकऱ्यांची मालिश करणाऱ्या मुस्लिम सेवकाची सर्वत्र चर्चा

धर्माच्या भिंती ओलांडून वारकऱ्यांची मालिश करणाऱ्या मुस्लिम सेवकाची सर्वत्र चर्चा

सजग नागरिक टाइम्स: पुणे : जगद्गुरु संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी काल पुण्यात दाखल झाली आहे.

या पालखी सोहळ्यासोबत लाखो माऊली भक्त ही पुण्यात दाखल झाले आहेत.

या भक्तांची सेवा करण्याचे काम अनेक जण करत असतात.

जो तो आपल्या परीने यांची सेवा करण्याचे काम करत असतो.

सध्या हैद्राबाद येथे स्थायिक असणारे मात्र मुळचे पुण्याचे
अब्दुल रजा हे गेल्या वीस वर्षांपासून वारकऱ्यांची सेवा करत आहेत.

सर्व जाती धर्माच्या पलीकडे जाऊन ते वारकऱ्यांची सेवा करत असतात. वारकऱ्यांची मालिश करून वारकऱ्यांचे दुःख दूर करण्याचे काम ते करतात.

अब्दुल रजा हे हैदराबादला राहायला गेले असले तरी दरवर्षी न चुकता हैदराबादहून ते पुण्यातील साखळीपीर तालीम मंडळात वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी येत असतात.

तसेच अनेक वारकरी बांधव त्यांची सेवा घेण्यासाठी येत असतात.

या सेवेबाबत अब्दुल रजा म्हणतात की, वारकऱ्यांची सेवा करून मला आनंद मिळतो. माझा मालिश करण्याचा व्यवसाय असल्यामुळे मी बनवलेल्या तेलाचा फायदा फोचवत असतो.

ह्या पंढरीच्या वारीच्या सणात दरवर्षी वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी या ठिकाणी येत असतो.

मनात कुठलाही भेदभाव न ठेवता सेवा हेच धर्म या भावनेने अब्दुल रजा गेले वीस वर्ष वारकऱ्यांना न चुकता सेवा देत आहेत.

Share Now
RELATED ARTICLES

1 COMMENT

Comments are closed.

Most Popular

Recent Comments